शिपायाचा मुलगा झाला असिस्टंट कमिशनर साहेब होत बापाचा वाढवला मान

0

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती कोणत्याही यशाला गवसणी घालू शकते.जीवनात कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर काय साध्य होऊ शकत याची अनेक तरूण वारंवार उदाहरण देत असतात.छोट्याशा कल्पनेतून मोठे उद्योगपती बनणारे तरूण-तरूणी तसेच एमपी एस सी,युपीएसी पास होणारे तरूण सातत्यान तरूणाईला दिशा तसेच प्रोत्साहन देत असतात.

असच एक प्रेरित करणार उदाहरण नोएडा येथील शिपायाच्या मुलान करून दाखवल आहे.नोएडा स्थित रमेश कुमार यांचा मुलगा मोहित कुमार हा बिटेक असून २०१८ पासून त्यान सिव्हील सर्व्हिसेसची तयारी सुरू केली व तीन वर्ष कठोर परिश्रम करत यंदा उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची प्रवेश परीक्षा पास केली असून उद्योग आयुक्त पद मिळवले आहे.

२०१८पासून मोहितन सिव्हिल सेवेची तयारी सुरू केली.यापूर्वी दोनदा पूर्व परिक्षा पास केली असून मुख्य परिक्षेला अपयश आल होत.या अपयशान खचून न जाता मोहित कुमारन पुन्हा तयारी करत परिक्षा दिली सरतेशेवटी यंदा पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षा त्यान उत्तीर्ण होत यशाला गवसणी घातली.

Leave A Reply

Your email address will not be published.