बाळासाहेब थोरातांच्या लेकीने पडळकरांना करून दिली संस्कारांची आठवण!

0

देवेंद्र फडवणीस ओबीसी चा राजकीय आरक्षणाविषयी बोलत असताना म्हणाले होते की ‘राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ असे त्यांनी सांगितले होते’. यावर तीच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक होत देवेंद्र फडवणीस यांना जुनी आठवण करून दिली बाळासाहेब थोरात म्हणाले की “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र यापैकी काहीही झालेलं नाही”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

याच वरून गोपीचंद पडळकर यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वरती आक्षेपार्ह भाषा वापरून टीका केली होती. गोपीचंद पडळकर म्हणाले “महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यामुळे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्रजी फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झालं आहे, याचंही भान यांना राहिलं नाही”. असे ट्विट त्यांनी केले होते.

पडळकर यांच्या या ट्विट ला जोरदार प्रतिकार करनारे ट्विट बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या “की पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार”..!

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानावरून चांगलीच राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.