
सुप्रिया सुळेंच्या प्रेमविवाहात दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी केली मदत
महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावणारी दोन कुटुंब म्हणजे पवार आणि ठाकरे होत.दोघांनीही स्वताचे पक्ष समर्थपणे पेलले आहेत.दोन्ही कुटुंबातील सौहार्द मैत्री तसेच नात्याचे संबंध सर्वज्ञात आहेत.सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेत आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांची जुनी मैत्री नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.
देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या ठाकरे कुटुंबाचा एक भाग असून दोन्ही कुटुंबातील मैत्रीपूर्ण संबंधांच नात्यात रुपांतर होण्यास त्याच कारणीभूत ठरल्या आहेत.वडीलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या सुप्रिया सुळे यांनी उच्च शिक्षण घेण्याबरोबरच राजकारणात स्वताचा वेगळा ठसा उमटवला आहे.शरद पवार नेहमीच स्वताच्या निर्णय प्रक्रियेमुळे चर्चेत असतात असाच एक निर्णय त्यांनी त्यांच्या विवाहावेळी पत्नी प्रतिभा यांना घातला होता.तो म्हणजे एकच मूल होऊ देण्याचा,परिणामी सुप्रिया ताई शरद पवारांच एकुलता एक अपत्य आहे.अशा प्रकारची मुलगा मुलगी एकसमान ही धारणा पवार साहेबांची कित्येक वर्षांपूर्वीच होती हे लक्षात येते.सुप्रिया सुळे यांचा जन्म 30 जून 1969 साली पुण्यात झाला.लहानपणापासून मुलगा मुलगी असा भेद न करता त्यांना वाढवण्यात आल.त्यांचे निर्णय त्या स्वता घेत असत.काॅलेज पार पडताच त्या पुण्यातील एका अग्रगण्य वृत्तपत्रात नोकरी करू लागल्या 1 वर्ष काकांकडे राहत असताना सहजच एका फॅमेली फ्रेंडकडे त्यांच जाण झाल व तिथेच त्यांची भेट एका तरुणाशी झाली, तो तरुण म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे सुपुत्र सदानंद सुळे होय.प्रथम भेटीतच दोघांची ओळख झाली.एकमेकांना समजून घेण्यासाठी दोघांनी सहा महिन्याचा अवधी घेतला.
बाळासाहेबांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला तसेच तात्कालिक पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली.बाळासाहेबांनी शरद पवारांना या विवाहाबद्दल विचारताच शरद पवारांनी आनंदाने होकार दिला.शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते.4 मार्च 1991 साली सुप्रिया पवार व सदानंद भालचंद्र सुळे यांचा विवाह पार पडला.या दांपत्याला विजय व रेवती अशी दोन अपत्य आहेत.सदानंद सुळे काहीकाळ अमेरिकेत होते. विवाहानंतर सुप्रियाही अमेरिकेत गेल्या तसेच त्यांनी बर्कले युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता.त्यानंतर सदानंद यांची बदली इंडोनेशिया, सिंगापूर येथे झाली तेथेही काही काळ त्या होत्या.कालांतराने त्या मुंबईत परत आल्या आणि खासदार झाल्या.