
बबनराव ढाकणे यांच्या एका मजेदार आंदोलनाने पाथर्डी तालुक्यातील घरा घरात वीज आली!
पाथर्डी तालुका हा अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात वंचित तालुका. सगळीकडे हिरवेगार शिवार तर इकडे दीड कांडी कुसाळी. जिल्ह्यात पाहिला साखर कारखाना झाला, कित्येकांच्या आयुष्यात साखर पेरणी झाली. मात्र पाथर्डी आहे अशी लोकांचा ऊस तोडून पोट भरणारी असंख्य लोक इकडचेच. यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते बबनराव ढाकणे यांनी.
मात्र आपल्याला असे काही करावं लागेल की आपल्याला आमदार नसताना सुद्धा प्रश्न मार्गी लावायचा आहे. सरळ एक सुप्त कल्पना डोक्यात ठेवून बबनराव ढाकणे यांनी “नाईक साहेब न्याय द्या” म्हणून पत्र लिहिले..आणि त्या पात्राच्या १०० प्रती छापल्या. तालुक्याला वीज मिळाली पाहिजे म्हणून सोबत ही लिहिलेली पत्र घेऊन मुंबई गाठली.
त्या वेळी जुलै मध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होते. बाळासाहेब यांच्या निवस्थानी ते थांबले. विधान सभेचा कसाबसा पास मिळवला. आणि मनात असलेल्या आपल्या कार्याच्या दिशेने ढाकणे साहेब निघाले. कोणती जागा पत्रक फेकण्यासाठी याचा अंदाज घेतला. कोणत्या जागेवरून सगळी कडे पत्रक फेकल्यावर जातील याचा अंदाज घेतला. असे काही धाडस करताना त्यांच्या मनात भीती होती मात्र प्रश्न सुटला पाहिजे ही आस्था पण होती.
विधानसभेत राज्यातील मातब्बर नेते उपस्थित होते. प्रश्नोत्तराचा तास संपला होता. कामकाज सुरू झाले तसे प्रेक्षक दालनाच्या कडेला बबनराव ढाकणे आले आणि कसलाही विलंब न करता मोठ्या ताकदीने पत्रक भिरकावत नाईक साहेब पाथर्डी तालुक्याला न्याय द्या असे मोठ्याने बबन ढाकणे ओरडले. व प्रेक्षक दालनातून विधानसभेच्या येण्याजण्याच्या रिकाम्या जागेत उडी मारण्यासाठी कठड्यावर चढायला लागले. असे असतानाच त्यांना लोकांनी खाली ओढले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी राज्यातील सगळ्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर बबनराव ढाकणे होते.
त्यांच्या या आंदोलनामुळे पाथर्डी तालुक्यात घरा घरात वीज पोहचली. नाईक साहेबांनी त्यांच्या या कार्याची दखल घेतली आणि पाथर्डी तालुक्या साठी वीज देण्याचे मंजूर केले!