
गाव कोरोनामुक्त करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोणाच्या कालावधीमध्ये केलेले कार्य हे फार मोठे आहे. महाराष्ट्र राज्यात झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे आणि रुग्णांना योग्य तो उपचार मिळवून द्यायचे काम आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. अहोरात्र काम करत त्यांनी आरोग्य मंत्री या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत लसीकरण गतीने करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. आरोग्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यांमधील 19 कोविड मुक्त गावांची तपासणी करण्यात येऊन यापैकी प्रत्येक तालुक्यातून तिने ग्रामपंचायतींना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
प्रत्येक तालुक्यातील ३ ग्रामपंचायती व जिल्ह्यातील १ ग्रामपंचायत अशा मिळून २५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींना 15 ऑगस्ट रोजी बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.