
औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांत पाटलांना अजित दादा दिसतात: अमोल मिटकरी
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. या वक्तव्याला अजित पवारांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. अजित पवार म्हणाले “चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत हे वक्तव्य केलं होतं” असा प्रश्न विचारला होता.
पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल”. असे म्हणत सरळ आव्हानच दिले आहे.
या विधानावर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे ते म्हणाले “औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याशिवाय मासे पडतात त्याप्रमाणे अवस्था भाजप नेत्यांची झाली आहे मात्र त्यांनी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत राज्यात पुढील पंधरा वर्षे महा विकास आघाडीची सत्ता असेल असा दावा सुद्धा अमोल मिटकरी यांनी केला आहे.