“अतुल भातखळकरांच डोक फिरलेल आहे,” शिवसेना आमदार मनिषा कायंदे

0

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत, असे सांगत राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.यानंतर भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांवर टिका करत असून अतुल भातखळकर यांनी पोलिसात तक्रार केली.

भातखळकरांच्या आक्षेप आणि तक्राररीनंतर शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, असा घणाघात कायंदे यांनी केला आहे.अतुल भातखळकर यांचे डोकं फिरलं आहे. त्याचं डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आला, त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचं बोलले? बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली असल्याचं कायंदे यांनी म्हटलं आहे.

केंद्राच्याही अशा सूचना आहेत. अनेक राज्यांनी या सूचनेचं पालन करत कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत. ते कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी किती मायग्रेट वर्कर अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहे. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार असल्याची टीका मनिषा कायंदे यांनी केली होती.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.