
रुग्णालयांवर हल्ले हा भाजपच्या विकासाचा नवा पॅटर्न ?
सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. बेड उपलब्ध झाली पाहिजेत, डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत. मात्र याबाबतीत राजकीय नेते डॉक्टर वरती दबाव आणण्याचे काम करत आहेत. राजकीय ताकतीचा उपयोग चांगली कामे करण्यासाठी वापरण्याऐवजी चुकीच्या ठिकाणी केला जात आहे.
महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाचा प्रसारा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वप्रथम झाला या दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत आहे. या ठिकाणी मनगट शाहीच्या जोरावरती डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणण्यात आला. सत्तेच्या जोरावरती चांगल्या सुविधा देता येऊ शकतात मात्र थेट हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. हा भाजपचा नवा पॅटर्न आहे की काय अशी लोकां मध्ये चर्चा आहे.
पुणे आणि नाशिक येथील महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून आरोग्य यंत्रणेवर दबाव निर्माण केला जात आहे. याबाबतीत ज्येष्ठ नेत्यांना तेथील महापौर आणि लोकप्रतिनिधी यांना पत्र पाठवून समज दिली पाहिजे. याबाबतीत स्वतःहून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोरे यांनी सूचना केल्या आहेत.
महापालिकेच्या बिटको कोविड सेंटर मध्ये मोटरसायकल घुसून भाजपच्या नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पती राजेंद्र यांनी तोडफोड केली आहे. ते सध्या फरार आहेत. या बाबतीत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.