
केंद्राच्या खर्चावर कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हल्लाबोल
आपला देश आज कोरोनाच्या वाईट परिस्थिती मधून जातो आहे. शेकडो मृत्यू झाल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळत आहेत. देशात राज्यात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. देशात आज हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन, आणि लस अशा विविध आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. मात्र केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारची एक अशा काळात सुद्धा खर्च करणारी गोष्ट मांडली आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे सांगितले आहे की “विश्वास ठेवायचा तर ठेवा. या भयानक अवस्थेत देश असताना केंद्र सरकारने आज २०,००० कोटींच्या संसद भवन विस्तार प्रकल्पाच्या निविदा मागवल्या”.
अशा काळात आपण इतर ठिकाणीच खर्च थांबवून माणसं वाचवली पाहिजेत. अनावश्यक गोष्टी सध्या तरी थांबवली पाहिजे. जेणेकरून आपल्याला या परिस्थितीवर मात करता येईल असा उद्देश या ट्विट मधून दिसून येतों. विश्वास ठेवायचा तर ठेवा म्हणत त्यांनी जनतेला गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे!