किमान करोना काळात तरी…!” सुप्रिया सुळेंनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खा.सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान कार्यालयाला टॅग करून महागाई संदर्भात ट्वीट केलं आहे. कोरोना मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच कौटुंबिक असणारे बजेट कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

“देशभरात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडरचे दर ८०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. अनेकांना ही रक्कम परवडत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत”. असे खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.

“सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे जनता त्रस्त असल्याचं सुप्रिया सुळेंनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “समाजातील बहुतांश घटक गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त आहेत. आपणास नम्र विनंती आहे की किमान करोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा. अवश्य यावर विचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्याल, हा विश्वास आहे. धन्यवाद”.

अशा आशयाचे ट्विट करत सुप्रियाताई सुळे यांनी वाढत्या महागाई वरून केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाच्या परिस्थिती मुळे नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कित्येक कुटुंब महागाई मुळे त्रस्त झाले आहेत. जनमानसातील असणारे हे प्रश्न लक्षात घेत सुप्रिया ताई सुळे यांनी जनमानसाची भावना व्यक्त केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.