
दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक मांडत असतात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे समोरच्या वक्तव्यावर, टिकेवर चपखल प्रतिक्रिया देत टोला लावण्याचे काम ते करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी भाष्य केल्याच्या नंतर ‘चोर के दाढीमे तिनका’ असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे, असे म्हणत आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जबरदस्त फिरकी घेतली आहे. ते मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रत्येक सोमवारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. आज पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी भाजप विरोधी तुफान बॅटिंग केली आहे.