
असली सिंघम कृष्ण प्रकाश यांचे वेषांतर, आणि पुढे काय झालं पहा!
पिंपरी चिंचवड चे आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्याबद्दल मीडिया मध्ये चांगलीच चर्चा असते. कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांच्याकडे लोक मोठ्या आशेने पाहत असतात. त्यांना जनतेशी पोलीस, अधिकारी कसे वागतात, त्यांचे प्रश्न कसे समजून घेतात हे समजून घेण्याची इच्छा आली. त्यांनी बुधवारी (ता.५) मध्यरात्रीनंतर नामी शक्कल लढवली आणि सरळ वेषांतर करून त्यांनी दोन तासांच्या या पाहणी दौऱ्यांत आयुक्तांनी पिंपरी, वाकड आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांना जमालखान कमालखान पठाण बनून भेट दिली.
त्यांच्या सोबत वेषांतर केलेल्या सीपी हे मियॉं, तर एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त, चाकण विभाग), प्रेरणा कट्टे या त्यांच्या बुरख्यातील बिवी बनून गेल्या होत्या. त्यांनी पिंपरीला नापास केलं तर इतर दोन्ही ठाणी पास केली. नेमकी परिस्थिती त्यांना समजली ती केलेल्या वेषांतरा मुळे नाहीतर त्यांना तत्काळ पोलिसांनी ओळखले असते. असे त्यांनी बोलत असताना सरकारणामा वृत्तवाहिनीला सांगितले. तसेच झिरो टॉलरन्स या आपल्या मोहिमेअंतर्गत भविष्यातही आपण वेषांतर करून धाडी टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर या विडिओ ने चांगलीच धुमाकूळ घातली आहे. त्यांच्या प्रामाणिक हेतूने प्रेरित केलेल्या कार्याची चांगलीच दखल नागरिकांनी घेतली आहे. अधिकारी असावा तर असा अशी चर्चा लोकांत सुरू आहे!