मी जाडी आणि काळी आहे म्हणून घरचे सुद्धा मला टोमणा द्यायचे,चला हवा येऊ दे च्या स्नेहल चा रडवणारा संघर्ष..!

0

खरंतर माणसाचा रंग आणि वर्ण यावरून माणसाचं कर्तुत्व घडत नसतो, ही वास्तविकता आहे.यशाला गवसणी घालण्यासाठी अपयशाला सामोरे जावंच लागतं. आज अश्याच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जिचा रंग तर काळा आहे पण तिच्या गुणांची सर कुणाला कधी येणार नाही.

खरंतर कॉलेजमध्ये असल्यासपासूनच स्नेहल एकांकिका, नाटकांमधून अभिनय साकारत असे. एक संधी म्हणून चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल मध्ये सहभागी होण्यासाठी तिने ऑडिशन दिली होती आणि तिने सर्व स्पर्धकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने विजेतेपद देखील पटकावले मात्र या यशापर्यंत येण्याचा तिचा प्रवास मात्र खूप खडतर होता. अगदी ओळखीचीच माणसं तिला तिच्या दिसण्यावरून टोमणे मारत असत.

मी किती काळी आहे, मी किती जाड आहे याची दरवेळी ते आठवण करून द्यायचे. स्नेहल ने नुकतीच मीडियाला एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत ती आपल्या प्रवासाचा उलगडा करताना दिसत आहे. स्नेहल म्हणते की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे त्यामुळे काहीतरी काम करून नोकरी करून पैसे कमावणे हा पहिला उद्देश होता.

प्रसिद्धी मिळण्याअगोदर ज्या ज्या वेळी मी ऑडिशनला जायचे त्या त्या वेळी मला रिजेक्ट केले जायचे. बहुतेकदा मैत्रिणीच्या भूमिकेसाठी बोलले जायचे मात्र त्यातही तू फिट बसत नाही असे सांगितले जायचे त्यानंतर मी आईच्या भुमीकेसाठी ऑडिशन द्यायचे मात्र वयाकडे पाहून तिथं सुद्धा मला अपयश पदरी यायचे.खरं सांगायचं झालं तर त्यांच्या नजरेतून मी कधीच कोणत्या भूमिकेत फिट बसले नाही.

माझे रिजेक्शन का केले जात होते याची पूर्ण कल्पना मला हळूहळू येऊ लागली होती. माझे जवळचे नातेवाईक देखील तू अजून काही करतेस की नाही असेच टोमणे मारायचे त्यावेळी मात्र मला खुप वाईट वाटायचं!मला का असा रंग दिला,मी का एवढी जाडी झाली असं वाटायला लागायचं.

आशा गोष्टी इग्नोर करायच्या म्हटलं तरी त्या गोष्टी आपल्या कायम डोक्यात राहत असतात. जेव्हा चला हवा ये द्या चा प्लॅटफॉर्म मिळाला तेव्हा मला खूप प्रसिद्धी मिळत गेली. आज मी जे काही आहे ते फक्त चला हवा येऊ द्या मुळे आहे. या शोमुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे.

आपण कसे दिसतो ह्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे त्यानंतर प्रत्येकालाच आपले आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते. प्रयत्न करत रहा, यश नक्कीच तुमचंच असेल!चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाची विजेती ठरली होती अभिनेत्री “स्नेहल शिदम “.

माझा होशील ना, भागो मोहन प्यारे यासारख्या मालिकेतून तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या.खरंतर आज स्नेहल लाखो तरुणीची प्रेरणास्थान बनली आहे,ज्या तरुणींना सुद्धा आशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल

त्यांनी सुद्धा स्नेहल कडून शिकलं पाहिजे की फक्त जिद्द सोडू नका,यशाची वाट खडतर असते ती पार करावीच लागते.आणि जोपर्यंत आपण आयुष्यात हा संघर्ष करणार नाही तोपर्यंत यशाची चव चाखायला आपल्याला मिळणार नाही,ही वस्तुस्थिती आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.