केंद्राचे सुरक्षा रक्षक अदर पुनावाला यांची रेकी करत आहेत काय?; नाना पटोले यांचा केंद्राला गंभीर सवाल!

0

सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावला सध्या सुरक्षेच्या कारणावरून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना धमकी दिली गेली असल्याचे त्यांनी एका मुलाखती मध्ये सांगितले. याच गोष्टीवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार वर गंभीर असे आरोप आज केले आहेत.

सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारत चांगलेच कोंडीत पकडले आहे.पूनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा का दिली. नेमके या पाठीमागे काय लपले आहे असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. सोबतच ते म्हणाले केंद्राने पुरवलेले सुरक्षा रक्षक अदर पूनावाला यांची रेकी करत आहेत काय?, असा गंभीर सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. अदर पूनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यांना कुणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावं.

अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारला कसलीही सुरक्षा मागितली नसताना तरीही त्यांना सुरक्षा का दिली आहे हे जाहीर करावं अशी त्यांनी मागणी केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.