केसाला लावा लाल कांदा रस, केसगळती, कोंडा दूर पळवून वाढवा दाट लांबसडक केस

0

बदलत्या वातावरणात तरुणाईतच केस गळती, टक्कल, कोंडा या केसांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. प्रदूषण, बदलेली जीवनशैली, आहार, जागरण यांमुळे केसांच्या समस्या उदभवतात.स्त्री, पुरूष दोहोंत समस्या आढळत असून यावर अनेक केमीकल उपाय केले जातात परंतु आज आपण एक पारंपारिक उपाय पाहणार आहोत ज्याचे कुठलेही साईड ईफेक्ट नाहीत.

साहित्य :
१) लाल कांदा – १
२) आल – १ इंच
३) खोबरेल तेल – २ चमचे

कृती :
१ लाल कांदा घ्या. कांदा लालच घ्यायचा आहे, पांढरा नाही. कांदा सोलून तुकडे करा व मिक्सरला १चमचा पाणी घालून फिरवून घ्या. आता वाटलेला कांदा गर गाळून घ्या.कांदा रस व कांदा गर वेगळा होईल. आल १ इंच घ्या साल काढून तुकडे करा व मिक्सरला फिरवा.

आल गर गाळून घ्या. रस वेगळा होईल, कांदा व आल गर तुम्ही वाटण म्हणून भाजीत वापरू शकता.फ्रिजला स्टोअर करू शकता. आ़ल रस तुम्ही सुकवून सुंठ पावडर करू शकता, चहात घालू शकता. आता एका वाटीत ४ चमचे कांदा रस, २ चमचे आल रस, २ चमचे खोबरेल तेल चांगल ढवळून मिक्स करा. केसांच्या मुळाला तसेच केसांना या मिश्रणाचा मसाज करा. १ तास केस तसेच ठेवा व नंतर केस रिठा किंवा शाम्पुने धुवा. हा उपाय ऋतुनुसार आठवड्यातील दोन दिवस किंवा १ दिवस महिनाभर करा व फरक बघा. उपाय आवडल्यास रिप्लाय द्या.

हा संपूर्णपणे आर्युवेदिक उपाय आहे.कांद्यात अँटी आॅक्सीडंट, व्हिटामिन ए, बी, सी असल्याने केस गळती, कोंडा, फंगल इन्फेक्शन दूर होते. आल्यात मॅग्नेशीयम, फॉस्फरस, पोटॅशियम असते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.