अस लावा बेसन पीठ आणि उजळवा चेहरा मिळवा निखार

0

भारतीय परंपरेत नवजात बाळाला बेसन पीठात दूध मिसळून अंगाला हलक्या हाताने लावत अंघोळ घालण्याची पध्दत आहे. बेसन पीठाने नवजात शिशूच्या अंगावरील लव निघून जाते व बाळाची त्वचा सुरक्षित राहू. नवजात बाळाला नैसर्गिक साबण म्हणूनच याचा वापर करतात. बेसन पीठ रंग उजवळण्यासही मदत करतो. बेसन पीठ व हळदीचा पॅक लग्नात मुलीला जरूर लावला जातो. बेसन पीठ उत्तम स्क्रबर आहे याने त्वचेवरील धूळ, राप निघून जातो.तसेच चेहर्याची मृत त्वचा दूर होते. बेसन पीठाने चेहर्यावर असणारे एक्सेस आॅईल दूर होते, पिंपल जातात, लव जाते, डाग दूर होतात. बेसन पीठ उत्तम फेशीयल आहे. तसेच याने स्कीन टोन सुधारून सुरकुत्या दूर होतात व चेहरा उजळतो. आज आपण बेसन पीठाचा एक नवा लेप पाहणार आहोत.

साहित्य
१) बेसन पीठ – २चमचे
२) कॉर्न फ्लोअर – १चमचा
३) कच्च किंवा न तापवलेल दूध – ५चमचे
कृती
बेसन पीठ, काॅर्न फ्लोअर एकत्र करा व त्यात दूध मिसळा व दाटसर पॅक तयार करा. हा पॅक चेहरा, गळा, मान यांना लावा व २५ मिनिटे ठेवा. आता पॅक थंड पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवा. कॉर्न फ्लोअरने त्वचा मॉश्चराईज होते. पिगमेंटेशन दूर होते, त्वचा हायड्रेट होते, त्वचा मुलायम होते. हा पॅक दररोज आठवडाभर लावल्यास रंग उजळून निखार येतो.

वरील उपाय आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.