काहीही हं! थेट बैलगाडीवरून लग्नाची वरात; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहाच!

0

“जुनं ते सोनं” अशी म्हण मराठी मध्ये आहे. काळाच्या ओघात आपण पुढे पुढे जात आहोत, या वेगाने होणाऱ्या बदला मध्ये आपण नव नवीन गोष्टी आत्मसात करत जात आहोत. जुन्या गोष्टी कालबाह्य होत चालल्या आहेत. सध्या सोशल मीडिया वरती सध्या अशाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओ मध्ये नवरदेवाची वरात ही बैलगाडीमध्ये घेऊन येताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील देवरियाचा असल्याचे सांगितले जात आहे.

या बैलगाडीत सर्व वर मंडळी बसलेले दिसत आहेत. ही लग्नाची वरात रस्त्याने जात असतानाच लोक आश्चर्याने पाहत होती. कारण कसलाही बडेजाव न दाखवता जुन्या काळात पार पडत असत तशीच लग्नाची वरात बैलगाडी मधून काढण्यात आली आहे. या वरातीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया वरती चांगलीच व्हायरल झाली आहेत.

या बद्दल नवरदेवाला विचारण्यात आले तेंव्हा नवरदेव म्हणाला की, आपले पूर्वज अशाचप्रकारे लग्नाची वरात घेऊन जात होते. मात्र, गाड्यांमुळे आपण आपली परंपरा विसरलो आहोत. यामुळे मी बैलगाडीवरुन वरात घेऊन जाण्याचे ठरवले. अशा आशयाचे मत त्याने व्यक्त केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.