दर्शनाची व्याकूळ ओढ स्वामींनी म्हातार्याच्या रुपात साक्षात दिले दर्शन

0

 

दैनंदिन आयुष्यात आपण अनेक व्यक्तींना भेटतो त्यातील काही व्यक्ती आपल्याला निरपेक्ष मदत करतात. संकटकाळात कोणीही मदतीला नाही, संकट दूर कसे होणार या चिंतनात असताना आपण देवाचे स्मरण करतो. आणि अचानक एखादी व्यक्ती देवदूताप्रमाणे येऊन आपली मदत करते व आपले संकट दूर होते. ही श्रध्दा आणि माणुसकीच आपल्याला जगण्याचे बळ देते. मित्रांनो एखाद्या भक्ताला देवाच्या दर्शनाची ओढ लागल्यास देव कोणत्या ना कोणत्या रुपात भक्ताची इच्छा पुरी करतो असा अनुभव अनेकजण सांगतात. अशीच एका स्वामी भक्ताची कथा आपण पाहणार आहोत.

आयुष्याचे चटके बसून मनान होरपळलेला तो स्वामींच्या मंदिरात जाऊन आयुष्यातील अडचणींचा पाढा स्वामींसमोर वाचायचा, तक्रार करायचा स्वामीच माऊली समजून त्यांच्यावर रागवायचा एकाकी आयुष्य जगणारा हा याला आई, वडील, भाऊ, बहीण असे कोणीही नव्हते. पोरका होता. आयुष्यात अनेक दुख भोगलेला तो फक्त स्वामींनाच आपल सर्वस्व मानत त्यांच्याजवळ मनमोकळ करायचा.त्याचा हा रोजचा दिनफ्रम होता. स्वताच्या मनातील व्यथा तो स्वामींना व्यक्त करायचा आपल पुटपुटण, त्रागा करण कोणी ऐकू नये म्हणून तो गर्दी नसताना भर दुपारी तो स्वामी मंदिरात जायचा. त्याचा हा दिनक्रम रोज चालू होता. मनमोकळ झाल्याने त्याला जगण्याच बळ मिळायच. बर्या, वाईट अनुभवात स्वामी बरोबर आहेत याची त्याला अनुभूती व्हायची.

एके दिवशी त्याला एका कामा निमित्त दुसर्या गावाला जाव लागल. काम आटपून परत येताना संध्याकाळ झाली. स्वामींच्या दर्शनाची ओढ त्याला व्याकूळ करत होती. परंतु त्यादिवशी गुरुवार होता. त्यात मंदिरात गर्दी असणार होती. परंतु दिनक्रम तो दिनक्रम व्याकूळ होऊन तो मंदिरात गेला. गुरुवार असल्याने भक्तांची रिघ लागलेली आज स्वामींशी संवाद होणार नाही या भावनेन तो हिरमुसला उद्ग्वीन झाला. प्रवासातल्या अनेक बाबी त्याला स्वामींना सांगायच्या होत्या. गर्दी कमी व्हायची लक्षण नव्हती तो नाराज झाला. नमस्कार करून तो मंदिराबाहेर आला. चप्पल ठेवली होती तिथे गेला, चप्पल घालताना त्याचा तोल गेला, एका म्हातार्या गृहस्थान त्याला आधार दिला. त्यान म्हातार्याकडे पाहील आणि कृतज्ञ झाला. म्हातारा गृहस्थ म्हणाला, “हेच माझ काम आहे रे, त्यान गोंधळून विचारल म्हणजे ! यावर तो म्हातारा गृहस्थ म्हणाला कोणाचा तोल जाऊ नये म्हणून सावरायच. तु आज रागवला नाहीस, भरभरून बोलला नाहीस मंदिरात. आज माझ्याशी तुला मनमोकळेपणाने बोलता आल नाही. तु नाराज झालास म्हणूनच तुझी वाट पाहत बाहेर थांबलोय. अरे असा पाहतोस काय? मी तुझा स्वामी”

वरील विधान ऐकून तो स्वामीचरणांवर कोसळला. त्यान चरणाना घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. लोकांना हा मिलाप कळत नव्हता. वटवृक्षाला घट्ट मिठी मारलेल्या त्याच्याकडे सर्वजण कुतुहलान पाहत होती. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो अशक्यही शक्य करतील स्वामी.

Leave A Reply

Your email address will not be published.