विरुष्काच “मुझको भी तो लिफ्ट करादे”

0

क्रिकेटचा बादशहा विराट कोहली आणि मनोरंजन दुनियेची नायिका अनुष्का शर्मा यांची जोडी सर्वोत्तम जोड्यांपैकी एक मानली जाते.हॉलीवूडमधील अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या नावाच्या अद्याक्षरावरून ब्रँजीलेना हे संयुक्त नाव केल गेल होत,तसच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नावाच विरुष्का अस संयुक्त नाव तयार केल गेल आहे.नुकतच या दोघांच्या संसारात यांच्या कन्येच आगमन झालेल आहे.अनुष्का शर्मा बेबी बम्पचेही फोटो शेयर करत असे,तसेच सध्या छोकरीबरोबरचे फोटो शेयर करत असते.विराट कोहलीने नुकतीच इंग्लंड सिरीज गाजवली असून वन डे आणि ट्वेंटी सामन्यात त्याच्या नेतृत्वाखालील टीमने उत्कृष्ट कामगिरी करत सिरीज जिंकल्या होत्या.

सध्या 9 तारखेपासून आयपीएलची सिरीज सुरू होणार असून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कडून धडाकेबाज फलंदाजी करत असतो.पहिला सामना असलेल्या या टीमचा विराट कॅप्टन आहे. याच दरम्यान क्वालिटी टाइम स्पेंड करणार्या या जोडप्याने मौजमस्ती केली. डिलेव्हरीतून उठलेल्या अनुष्कान परत स्वताचा फिटनेस तसेच फिगर परत मिळवण्यासाठी मेहनत घेतल्याचा नमुना यावेळी दिसून आला.अनुष्कान विराट कोहलीला मागून पकडत वर उचलल आणि सगळे अवाक झाले.तिन विराटला उचलण्यापूर्वी सांगितल “विराट डोंट लिफ्ट युवरसेल्फ” मी स्वता तुला उचलून दाखवेन,विराटनेही बायकोची आज्ञा प्रमाण मानत उभा राहिला आणि अनुष्कान त्याला लिफ्ट केल तसेच स्वताचे डोले दाखवले.

आयपीएलपूर्वी विराटन अस तर म्हटल नसेल ना “मुझकोभी तो लिफ्ट करादो” पण अशी शक्यता कमीच असून हार्ड वर्किंग विराट कोहली उत्तम सराव आणि खेळातील सातत्य यासाठी ओळखला जातो.क्रिकेट विक्रमाचे अनेक आयाम रचणारा विराट कोहली तरूण खेळाडूंना तर मार्गदर्शक ठरतोच पण फिटनेसमुळे चाहत्यांनीही वेड लावतो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.