महागाई विरोधी काँग्रेसची रॅली म्हणजे भाजाप सरकार विरोधातील नवक्रांतीची सुरुवात – दिगंबर कामत

0

देशभर मधील इंधनाच्या दरवाढी विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. देशभरामध्ये वारंवार इंधनाचे मोठ्या प्रमाणामध्ये भाव वाढत आहेत मात्र याबाबतीत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष सरकारने वाढवलेल्या महागाईविरोधात लढा देणार असून, आजची निषेधात्मक सायकल रॅली ही भाजपसरकारविरोधातील नवक्रांतीचीच सुरुवात आहे, असे प्रतिपादन गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.

भारतीय जनता पक्षाने साठ रुपये मध्ये पेट्रोल देण्याचे आश्वासन देत सत्तेमध्ये बाजी मारली मात्र आज पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत याविरोधात काँग्रेसकडून मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला वंदन करून काँग्रेसच्या महागाईविरोधातील निषेधात्मक सायकल रॅलीला सुरुवात झाली.

पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या करांमधून येणारा पैसा नेमका जातोय कुठे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला जनतेकडून लुटला जाणारा हा सगळा पैसा नेमका जातोय कुठे. कोविडच्या काळात जनतेला सोसाव्या लागलेल्या त्रासाची कल्पना भाजप सरकारला नाही. जनतेची थोडी जरी काळजी असेल, तर सरकारने केलेली इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी लुईझिन फालेरो यांनी केली. जोपर्यंत सरकार इंधन दरवाढ मागे घेत नाही तोवर राज्यभरात असे निषेध कार्यक्रमाचे घेण्यात येतील, असे यावेळी आल्तिनो गोम्स यांनी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.