मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

0

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचा दुर्दैवानं अपघात झाला त्या सकाळी अकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता.

रामलीला मैदानाच्या दिशेने जात असताना वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकप टेम्पोची धडक बसली. ही घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ घडली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे वर्षा गायकवाड यांचा मोठ्या अपघात टळाला.

पोलिसांनी तात्काळ टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण अशा नेत्या तथा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविषयी समाज माध्यमावर्ती काळजी व्यक्त केली जात आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.