परमवीर सिंग यांचे दात घशात !

0

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी बदलीनंतर लेटर बॉम्ब करत गृहमंत्री अनिल देशमुखांवर पैसे वसूल करण्याच टारगेट देत असे गंभीर आरोप केले होते.या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.याज्य शासनाच्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत दूध का दूध पानी का पानी कराव अशी मागणी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती मात्र राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्र्यांच्या चौकशी व राजीनाम्याची गरज नसून मुख्यमंत्र्यांनी वाटल्यास चौकशी करावी असे म्हटले होते.बुधवारी रात्री अखेर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तींमार्फत अनिल देशमुखांची चौकशी करण्याच ठरवल आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल यांनी ट्विट करत ‘मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमवीर सिंह यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून दूध का दूध पानी का पानी करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर मी त्याचे स्वागत करीन.’ असेही त्यांनी सांगितले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.