१४ एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता

0

मुंबई : मुंबई हायकोर्टानंतर, सर्वोच्च न्यायालयाने देखील माजी गृहमंत्र्यांना, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या गंभीर आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश देऊन दणका दिल्यानंतर, आता देशमुखांना सीबीआयने समन्स बजावले आहे.

वकील जयश्री पाटील यांनी अनिल देशमुखांवर, परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या गंभीर आरोपाच्या संदर्भात दाखल केलेल्या रिट याचिकेवर, मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत, अनिल देशमुखांच्या १५ दिवसांच्या सीबीआय प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकार, यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानुसार आता १४ एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.