अनिल देशमुखांनी सीबीआय चौकशीत सर्व आरोप फेटाळले

0

मुंबई पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत केलेले १००कोटींची हप्ता वसुली तसेच इतर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीदरम्यान फेटाळून लावले.अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी जवळजवळ सात तास सुरू होती आणखी काही दिवस ही चौकशी सुरू राहणार आहे.काल झालेल्या चौकशीत अनिल देशमुखांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांना फेटाळून लावल.

परमवीर सिंह,सचिन वाझे यांच्याशी आपले कार्यालयीन तात्कालिक संबंध होते इतर कोणतीही निकटता नव्हती अस त्यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केल.रेस्टॉरंट,बार,हॉटेल,पब यांच्याकडून १००कोटी महिना वसुलीच टार्गेट अनिल देशमुख देत हा परमवीर सिंहांनी केलेला आरोप खोट असरल्याच त्यांनी स्पष्ट केल.आपण अशाप्रकारे कोणतीही वसुली सांगितली नसल्याच त्यांनी सांगितल.परमवीर सिंहांनी केलेले सर्व आरोप धांदात खोटे असल्याच त्यांनी सांगितल.

कारमायकल रोडवर प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोर सापडलेल्या स्फोटक भरलेल्या स्कॉर्पीओबाबत आपला काहिही संबंध नसून सचिन वाझेची त्याबाबत चौकशी सुरू असल्याच त्यांनी स्पष्ट केल.या प्रकरणानंतर परमवीर सिंहांची बदली केली गेली व लगेचच त्यांनी आपल्यावर आरोप केले असही ते म्हणाले.एकूणच अनिल देशमुखांनी सर्व आरोप नाकारले असून भविष्यात आणखी काही दिवस त्यांची सीबीआय चौकशी होणार आहे त्यात त्यांच निरपराधित्व सिध्द होण्याची आशा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.