अंगणवाडी सेविकेने कोरोनासाठी देणगीत दिला संपूर्ण पगार, भारावलेल्या रोहित पवारांनी केलं कौतुक!

0

कोरोनाच्या महामारी मुळे देशासमोर मोठे संकट उभे आहे. या संकटाला चा सामना करण्यासाठी सरकार बरोबरच नागरिक सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. फुल नाही पण फुलाची पाकळी अशा प्रकारे मदत नागरिक राज्य सरकारला करताना दिसून येत आहेत. अशीच मदत एका अंगणवाडी सेविका ने केली आहे

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड मधल्या एका अंगणवाडी सेविका ने आपल्या आचरणातून आदर्श घालून दिला आहे. सामाजिक संस्था, उद्योगपती, सहकारी साखर कारखाने, बँका, अशा विविध ठिकाणाहून राज्य सरकारला मदत करण्यात आली मात्र नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. सर्व सामान्य कुटुंबातील लोकांनी पोटाला चिमटा घेऊन राज्यसरकारला मदत दिली आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार आर्थिक अडचणी मध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार राज्य सरकारला द्यावा असे आवाहन करण्यात आले होते. चांगल्या असणाऱ्या पदावरील अधिकाऱ्यांनी यास विरोध दर्शवला होता. मात्र अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी एका दिवसाचा नाही तर एका महिन्याचा पगार देणगी म्हणून दिला आहे.

जामखेड याठिकाणी डॉ.आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी रुपात मीनताई मुसा शेख यांनी त्यांचा एका महिन्याचा पगार पवित्र रमजान महिन्या च्या निमित्त जामखेड याठिकाणी डॉ.आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी रुपात मीनताई मुसा शेख यांनी त्यांचा एका महिन्याचा पगार दिला आहे.

आ. रोहित पवार यांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केलं आहे. ‘मीनाताई तुमची दानत पाहून अक्षरशः भारावून गेलो’ असं म्हणत त्यांनी मीनाताईंचे आभार मानले. मीनाताई यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.