आणि स्वामींनी आजींना दृष्टांत दिला, मूर्तीत डाॅक्टरना ऐकू आले ह्रदयाचे ठोके

0

एका वयस्कर आजींची स्वामी समर्थांवर निस्सीम भक्ती होती. त्या रोज स्वामींच्या मूर्तीला दूध पाणी घालून, स्वच्छ धूवून पूसून, गंध, अक्षता, फुलं वाहून खडिसाखरेचा नेवैद्य दाखवत. मगच त्या स्वतः चहा घेत. वर्षानूवर्ष त्यांच्या या नियमात कधिच खंड पडला नाही. थकत्या वयात आजींचे हात थरथरत, पाय लटपटत तरिही त्या निग्रहाने आपला नेम बरोबर न चुकता करत.

एकदा त्या अंगणात फुलं आणायला गेल्या, फुलं आणून देवघरात पाटावर येऊन बसल्या तसं त्यांना हात थरथर कापतोय असं जाणवलं. तरी स्वामींची मूर्ती उचलून ताम्हणात ठेवायचा प्रयत्न केला, पण हातातुन निसटून ती जमीनीवर पडली. ठण्णकन् आवाज ऐकून सुन धावतच आली. तर आजी ओक्साबोक्शी रडत होत्या. तिला वाटलं ताम्हण पायावर पडलं की काय, पण पहाते तर स्वामींची चांदिची मूर्ती जमीनीवर पडलेली. तिने मुर्ती ऊचलून कपाळी लावली अन् ताम्हणात ठेवली. आजींचा गोंधळ सुरूच होता, स्वामी पडले गं, असं कसं झालं. मी गाफिल राहिले, हातून निसटले, पडले गं पडले. केवढं टेंगूळ आलंय बघ. कसे कासावीस झालेत. चल चल लवकर डॉक्टरला फोन कर, बोलव लवकर. आजींनी सुनेच्या मागे हट्टच लावला. शेवटी तिने फोन केला. तिचा भाचा डॉक्टर असल्याने तो म्हणाला, पेशंट्स आटपून येतोच तासाभरात.

तेवढा वेळ आजी गप्प बसेनात, असं कर तू स्कूटिवर स्वामींना घेऊन जा. लवकर औषध पाणी केलं पाहिजे. सुनेला रहावेना, असं कसं लोक काय म्हणतील. म्हातारी एक ठिकंय पण सुन ही नादिष्टपणा करतेय. सुन म्हणाली येतायत ना डॉक्टर तोपर्यंत आपण थांबु, काहितरी करू दरम्यान आजींनी फ्रिजमधून बर्फ मागीतला. स्वामींना बर्फाचा शेक दिला डबीतून हळद काढून लेप लावला. तो पर्यंत डॉक्टर आले, सुनेने देवखोलीत प्रवेश करण्या आधी डॉक्टरांना हात पाय धूवायला नेताना सर्व सविस्तर संगीतलं. त्या तरूण डॉक्टरला गंमत वाटली. देवघरात येऊन मोठ्या गांभीर्याने तो स्वामींना तपासत असताना त्याला एक जाणवलं हि हि मूर्ती गरम कशी.. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत आजी म्हणाल्या ताप आहे का रे ? तपास बाबा नीट, डॉक्टरांनी आजींच्या समाधानासाठी मुर्तीला स्टेथोस्कोप लावला अन् काय आश्चर्य.त्या मूर्तीमधून हार्ट बिट्स ऐकू येत होते.. तो चमकला, भांबावून गेला. सुनेला म्हणाला आत्या खऱंच आजींची श्रद्धा खूप मोठी आहे.. ऐक त्यांनी स्टेथोस्कोप सुनेला ऐकवला, तिचेहि डोळे भरून आले. डॉक्टरांनी मुर्तीला सतत गार पाण्याचा अभिषेक करायला संगीतला. अन खरोखरच आराम पडला स्वामींना आणि आजींना..

श्री स्वामी समर्थ.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.