“आणि मला एकाच मुलगी आहे आणि ती राजकारणापासून’…जितेंद्र आव्हाड!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत भारतीय जनता पक्षाचे गोरखपूर येथील खा.रवी किशन यांच्यावरती ट्विट करत चांगलीच खरमरीत टीका केली होती “कारण त्यांना चार अपत्ये असून ते लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार होते”. जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की “स्वतःला चार मुलं असलेले भाजपाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन “लोकसंख्या नियंत्रण विधेयक” मांडणार. ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस म्हणतो, “गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते.” असे म्हणत त्यांनी बोचरी टीका केली होती.

आज पुनश्च एकदा त्याच ट्विटला रिट्विट करत त्यांनी माहिती दिली की “आणि मला एकाच मुलगी आहे आणि ती राजकारणापासून कोसो दूर आहे…आणि राहील”. असे म्हणत आपल्या मुलीच्या राजकीय चर्चेविषयी त्यांनी पूर्णविराम दिला आहे. तसेच त्यांना एक आपत्ती असल्याची त्यांनी पुनरावृत्ती करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावरती थेट टीका केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.