…आणि सुप्रिया सुळे यांनी केलं त्या फिल्मचे कौतुक!

0

चित्रपट आणि राजकारण हे दोन क्षेत्र वेगवेगळे आहेत मात्र सामान्य जनतेला या दोन्ही क्षेत्राच्या बद्दल मोठं कुतूहल सातत्यानं राहिलेल आहे. चित्रपटातील “अभिनेते” असतील आणि राजकारणातील “राजकारणी” असतील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी चित्रपट पाहात चित्रपटाचे कौतुक केले आहे.

सुप्रियाताई सुळे ट्विट करत म्हणाल्या की “पंकज साठे या दिव्यांग व्यक्तीने ‘महिला सशक्तीकरण’ या विषयावर एक फिल्म तयार केली आहे. ही आवर्जून पाहिली. अतिशय चांगला संदेश देणारी ही फिल्म तयार केल्याबद्दल पंकज साठे यांचे मनापासून आभार”. सोशल मीडिया वरती सातत्याने सक्रिय असणारे नेत्या सुप्रिया ताई यांचा सामाजिक असणारा अभ्यास मोठा आहे. सातत्याने त्या राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना भेटत असतात. त्यांच्या कला आणि कलाकृती बद्दल त्या माहिती घेत असतात. तसेच त्यांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचे काम त्या आग्रहाने करत असतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.