राममंदिर निर्मिती साठी जमा केलेला पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय कीनाही, पाहण्यासाठी अराजकीय समिती स्थापन करावी – जयंत पाटील

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राममंदिर निर्मिती साठी उभा केलेल्या निधी मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पहिल्यांदा बोलले आहेत. राममंदिर निर्मिती साठी लोकांनी पैसा पैसा गोळा केला आणि त्या मध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर हे दुर्दैवी आहे.

जयंत पाटील म्हणाले की “राममंदिरासाठी जमा केल्या जाणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होत असल्यास ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी. असे मत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केलेय.

देशभरातून राममंदिरासाठी रामभक्त मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. जर या मध्ये काही लोक भ्रष्टाचार करत असतील तर ते दुर्दैवी आहे. जयंत पाटील म्हणाले की “जे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून ते किती लांब आहेत हे स्पष्ट होते. अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.