महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आज कर्नाटकचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात संपन्न!

0

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मा. बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी बैठक संपन्न झाली. या बैठकीला दोन्ही राज्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थितीत होते.

जयंत पाटील यांनी ट्विट करत या बाबतीत माहिती दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की “पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मा. बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासोबत व दोन्ही राज्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली”. अशी माहिती त्यांनी बैठकीच्या नंतर दिली आहे.

ही बैठक सातारा, सांगली भागात २०१९ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, या हेतूने संपन्न झाली आहे. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान-प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित केली जाईल.

कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर तदनुषंगिक मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी बैठकीच्या एक दिवस अगोदर ट्विटरवर दिली होती. आज ही बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.