
पुण्यात संचारबंदीचे नियम धाब्यावर त्यातच रेमेडिसेव्हरचा काळाबाजार होत असल्याचे आरोप
राज्यात काल संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले गेले आहेत.अत्यावश्यक सेवाही सकाळी ७ ते संध्याकाळी ८ एवढ्याच वेळात सुरू राहणार आहेत.राज्यात कोरोनाचा विस्फोट होत असून आरोग्य यंत्रणा हतबल ठरू लागली आहे.मुंबईत कोरोना रुग्णांसाठी १५ बेड शिल्लक आहेत.कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असल्यान त्यांच्यासाठी वेगळ आरोग्य व्यवस्थापन केल गेल आहे.ही व्यवस्था आता अपुरी पडू लागली आहे.यातच राज्यात काल लागलेल्या संचार बंदीच्या निर्बंधाला आज सकाळपासूनच हरताळ लागल्याच निदर्शनास येत आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावर तातडीन भाष्य करत गर्दी कमी झाली नाही तर अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात येतील असा इशारा दिला आहे.
आज सकाळी पुणे मार्केट यार्डात संचारबंदी,गर्दीचे नियम धाब्यावर बसल्याच दिसून आल.तुंबलेली वाहन खरेदी,विक्रीसाठी आलेल्या लोकांची खच्चून गर्दी,मास्क हनुवटीवर घसरलेले सगळीकडे अनिर्बंध हाताळणूक अस दृश्य समोर दिसत होत.या गर्दीच करायच काय? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागासह सर्वच ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्युदर दरदिवशी वाढत आहे.राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.पुणे जिल्ह्यात रेमेडिसेव्हरचाही तुटवडा जाणवत असून रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत.दरम्यान नातेवाईकांनी पुण्यात रेमेडिसेव्हरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप केला आहे.काही ठिकाणी हे रेमेडिसेव्हर चढ्या दराने विकले जात असून काही रुग्णांना ते मिळण मुश्किल झाल आहे.रुग्णांच्या नातेवाईकांची रेमेडिसेव्हरसाठी हेलपाटणूक,आडवणूक तसेच ४ ते५दिवस तटवणूक केली जात आहे,प्रशासनान ही बाब लक्षात घेत यावर उपाययोजना कराव्यात असा आंदोलकांचा इशारा आहे.
काल लागलेल्या या निर्बंधांना लोक आजच जुमानत नाहीत अस चित्र आहे.राज्यातील एकूणच वाढती रुग्णसंख्या पाहता स्थिती चिंताजनक आहे.आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यावर व्यवस्थापनेचा येणारा ताण असहय्य होत आहे.वाढलेल्या मृत्युंमुळ स्मशान भूमीही अपुरी पडू लागली आहे.