गरीब शेतकऱ्याच्या पाचही मुली झाल्या RAS काबाडकष्ट कष्ट करणार्या हाताला आल झळाळी यश

0

राजस्थानमधील हनुमानगडमधील तीन बहिणी राज्याची प्रशासकीय परीक्षा एकाच वेळी उतीर्ण झाल्या. त्यांच्या इतर दोन बहिणींची आधीपासूनच अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पाचही बहिणी आता राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) अधिकारी आहेत.इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) अधिकारी परवीन कास्वान यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आणि या बहिणींचे अभिनंदन केले. त्यानी या बहिणींचा फोटोही शेअर केला आहे.

”ही खूप चांगली बातमी आहे. अंशु, रीतु आणि सुमन राजस्थानच्या हनुमानगडमधील तीन बहिणी आहेत. आज तिघींची RASमध्ये एकत्र निवड झाली आहे असून त्यांनी त्यांच्या वडीलांना आणि कुटुंबियांची मान गर्वाने उंचावली आहे.त्या पाच बहिणी आहेत. इतर दोघी रोमा आणि मंजू आधीच RAS अधिकारी झाल्या आहेत. सहदेव सहारन यांच्या पाचही मुली आता RAS अधिकारी झाल्या आहेत, ” अशी शब्दात कास्वान यांनी ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या या ट्विटला ५००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि बर्याच लोकांनी कॉमेंट कररून या बहिणींचे अभिनंदन केले आहे.

राजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) मंगळवारी RAS 2018 चा अंतिम निकाल जाहीर केला. झुंझुनू येथील मुक्ता राव या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उतीर्ण झाली तर टोंक येथील मनमोहन शर्मा आणि जयपूर येथील शिवाक्षी खंडाल दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाने उतीर्ण झाल्या आहेत.मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही ट्विट करून टॉपर्सचे अभिनंदन केले.RAS परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या झुंझुनूच्या मुक्ता राव, टोंकचे मनमोहन शर्मा, जयपूरच्या शिवाक्षी खंडाल यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. समर्पणाने राज्याची सेवा करण्याची ही एक उत्तम संधी आहे. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा, “असे ट्विट करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. आरपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.