पुण्यात अनंत चतुर्दशीदिवशी सर्व दुकान बंद राहणार, अजित दादा पवार

0

पुण्यातील कोरोना संदर्भातील उपाय योजनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लागणार्या निर्बंधाबाबत माहिती दिली. निर्बंधाबाबत जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून निर्णय घेतला असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.राज्यावर कोरोनाचे संकट असून यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. मात्र, तरीही पुण्याच्या मध्यवर्ती भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गणेश विसर्जनादिवशी काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विसर्जनादिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट-हॉटेल सुरू राहणार असून पिंपरी चिंचवडलाही हे निर्बंध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकवर्षी गणपतीला वाजतगाजत निरोप दिला जातो. यावेळी कोरोनाचे संकट असल्याने विसर्जनादिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा, रेस्टॉरंट-हॉटेल वगळता इतर सर्व दुकानं रविवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. हे निर्बंध पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि कॅन्टोनमेंट क्षेत्रात लागू करण्यात येईल. सध्या कोरोना बाधित रुग्ण आणि मृत्यू दरात घट झाली आहे. रुग्ण वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. शहर आणि जिल्ह्यात आजअखेर ९३ लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास येत्या दोन ऑक्टोंबरला बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण विभागात वाढणारे कोरोना रुग्ण पाहता हे निर्बंध लावणे गरजेचच होत अस मत सर्वच आमदार, खासदार यांनी व्यक्त केल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.