अक्षयचा कंगनाला गुपचूप फोन; कंगनाने सांगितले यामागचे गुपित.

0

अक्षयचा कंगनाला गुपचूप फोन; कंगनाने सांगितले यामागचे गुपित.
कंगनाच्या वाढदिवशी ‘थलायवी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला आणि कंगनाच्या अभिनय कौशल्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनीही कंगनाचं कौतुक केलं. मात्र काही जणांनी इतरांना घाबरून गुपचूप तिला फोन करून ट्रेलरची वाहवा केल्याचं कंगनाने सांगितलं. बुधवारी ट्विट करत कंगनाने याबद्दलचा खुलासा केला.

काही जणांनी मला गुपचूप फोन केले आणि माझ्या ‘थलायवी’ ट्रेलर साठी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये अक्षय कुमार याचा देखील समावेश असल्याचे तिने सांगितले. “बॉलिवूडमधील वातावरण इतकं प्रतिकूल झालं आहे की उघडपणे माझं कौतुक केल्यानेही लोक अडचणीत येऊ शकतात. मला बड्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या खरे परंतु, ते आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या चित्रपटांचं जसं उघडपणे कौतुक करतात, तसं माझ्याबाबतीत करू शकले नाहीत. ही चित्रपट माफियांची दहशत आहे”, असं कंगनाने एका ट्विटमध्ये म्हटलं. यावेळी आणखी एक ट्विट करत कंगनाने सिनेमा आणि इतर गोष्टींवरील तिची मतं यात गल्लत करू नये असं देखील म्हटलंय.

 

 

 

“कलेच्या बाबतीत इंडस्ट्रीने तत्वनिष्ठ राहावं अशी माझी इच्छा आहे. सिनेमाचा विषय असेल तर त्यात पॉवर प्ले आणि राजकारण आणून नये. राजकीय आणि आध्यात्मिक विषयांवरील माझ्या मतांमुळे मला छळाचं आणि धमक्याचं लक्ष्य बनवू नये. परंतु तसं होत असेल तर नक्कीच मी जिंकेन”,असे कंगनाने ट्विट करत सांगितले.

सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बहुचर्चित ‘थलायवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.यामध्ये कंगना जयललिता यांची भूमिका साकारत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिने देखील कंगनाची त्यामधील भूमिका पाहून स्तुती केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.