अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ने मोडला रेकॉर्ड

0

काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा खिलाडी मानला जाणारा अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. आता या चित्रपटाने टीव्हीवर नवा विक्रम केला आहे. २१ मार्च रोजी ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजीन प्रिमिअर पार पडला. त्यावेळी चित्रपटाला संपूर्ण भारतात ६३ मिलिन व्ह्यूअर्स मिळाले असून गेल्या पाच वर्षात सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला आहे.

स्टार गोल्डच्या वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियरने पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट गेल्या ५ वर्षांमधील सर्वाधिक रेटिंग मिळालेला चित्रपट ठरला असून आता पर्यंत सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला आहे.ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात होते.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात आला होता. अमेरिका आणि कॅनडामधील प्रेक्षकांसाठी देखील हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.