
लिओनार्दो कॅप्रिओसह अक्षय कुमारला पर्यावरण संवर्धन कामगिरीसाठी गोल्डन ग्लोब आॅनर्स पुरस्कार
हॉलीवूडचा चॉकलेट बॉय लिओनार्दो टायटॅनिकमुळ भारतातही प्रसिध्द आहे.अक्षय कुमार तर बॉलीवूडच चलनी नाण आहे.तर या दोघांच तसा काहीच मेळ नाही की दोघांनीएकत्र कामही केलेल नाही पण दोघांनीही पर्यावरण संवर्धनासाठी जागृती,फंडींग तसेच स्वताही पुढाकार घेतला आहे.
लिओनार्दो या प्रकारच्या जागतिक मोहिमेत जोडलेला असून तो सातत्यान बदलत हवामान,वृक्ष संवर्धन यासाठी जगभरात फिरत असतो.ब्राझीलमध्ये लागलेल्या जंगलाच्या आगीत लिओनार्दोन अंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याबरोबरच फंडींगही केल होत.
अक्षय कुमारही पर्यावरणाच्या या मोहिमेत जोडला गेला असून तोही फंडींग व जागृती करत असतो.दरम्यान प्रतिष्ठीत अशा गोल्डन ग्लोब अॅवाॅर्डमध्ये या दोघांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी गोल्डन ग्लोब आॅनर्सतर्फे या दोघांनाही अॅवाॅर्ड देत गौरवल आहे.
बाॅलीवूडचा खिलाडू अक्षय कुमार आॅस्करच्या स्पर्धेत अजूनतरी स्पर्धक ठरला नाही आहे,परंतु प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब मात्र त्यान मिळवला आहे.परिणामी अक्षय कुमारच सर्वत्र कौतुक होत आहे.