खा. शरद पवारांचे उदाहरण देत अजित पवारांची सुजय विखे वर टीका!

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शरद पवार साहेब यांचे उदाहरण देत चांगलीच फिरकी घेतली आहे. अजिदादांनी जे वक्तव्य केलं आहे त्याने सुजय विखे यांच्या अडचणी मध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता दिसून येते आहे.

मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित दादांनी सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की ” खा.सुजय विखे यांनी परदेशातून आणलेले इंजेक्शन व इतर साहित्य सरकारकडे जमा करण्याचे आदेश हे औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तुम्ही जरी लोकप्रतिनिधी असाल तरीही तुमच्या ओळखीने आणलेले साहित्य कोणत्या कंपनीचे आहे, लोकांना देण्याच्या योग्य आहेत का ? त्यांची तपासणी झाली आहे का? मान्यता आहे का? अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मान्यता दिली जात असते.

ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे पण सगळीकडे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र त्यांना रेमडेसिव्हीर कोणीही उपलब्ध करून दिले असता ते पुणे, साताऱ्याला द्यायचे तर तिथल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यायला सांगायचे, मुंबई मध्ये असेल तर तिथले आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे द्यायला सांगायचे. प्रशासनाच्या मार्फतच ही औषधे दिली गेली पाहिजेत असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.

अजिदादांनी शरद पवार साहेब यांचे उदाहरण देत कायदेशीर बाबी तसेच प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, अशा गोष्टी प्रशासनाकडे देणे किती गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात आणून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.