
अजितदादा म्हणाले, ‘ह्या तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अवलादी’ !
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता काही रुग्णालयात काळाबाजार होताना दिसत आहे. नागरिकांना अशा गोष्टींचा सामना रुग्णालयात पेशंट आजारी असताना करावा लागतो आहे. आपल्या रुग्णाला त्रास होऊन नये, सुविधा मिळाव्यात या साठी होईल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न जो तो नातेवाईक करताना दिसत आहे.
अशा परिस्थिती मध्ये सुरू असणारी लुट म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अवलादी असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरीत केला. अशा लोकांचा बंदोबस्त केला जाईल, असे सूचित करताना पिंपरी पालिकेच्या ऑटोक्लस्टर कोरोना सेंटरमध्ये मोफत आयसीयू बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याच्या काल उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेत कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
पालिकेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड साठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. हा प्रकार पालिकेचे कोरोना सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरने घेतल्याचा खळबळजनक प्रकार दोन नगरसेवकांनी उघडकीस आणला. हा गैरप्रकार करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई चे संकेत त्यांनी बोलताना दिले. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी या गोष्टीवर भाष्य केलं.