शाळा भरली नसेल तर पालकांवर अन्याय नको! फी संदर्भात मार्ग काढणार – अजित पवार

0

कोविड मुळे सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत मुलांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या आहेत; तर काही वर्गांना विना परीक्षा घेत पास करण्यात आले आहे.

मात्र महाराष्ट्रातील बहुतांश शिक्षण संस्थांकडून फी आकारण्यात आली होती व आकारली जात आहे. याबाबतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने लक्ष घातले आहे व विद्यार्थ्यांच्या पालकावर अन्याय होऊ नये अशी भूमिका घेतली आहे.

शाळा सुरू नसतानाही शिक्षण संस्थांकडून फी आकारली जात आहे. यासंदर्भात समन्वयाने मार्ग काढू. शाळा भरली नसेल तर संस्थेने विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय करू नये.

याबाबत संबंधित विभागाशी बोलून मार्ग काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या फी चा हा प्रश्न अजित पवार मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांसंदर्भात झालेल्या बैठकीत नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्या वेळी ते बोलत होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.