
अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला !
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज मराठवाडा दौऱ्यावरती आहेत. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांनी आज भेटी दिल्या सोबतच त्यांनी कोरोना परिस्थितीचा आणि खरीपाच्या पेरणीचा आढावा घेतला. या दोन्ही जिल्ह्यातील आढावा घेत असताना. उस्मानाबाद शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय अजितदादांचा ताफा पोहोचला असता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पावसात भिजणाऱ्या पोलिसांना पाहून गार्ड ऑफ ऑनर नाकारला आणि पोलिसांना भिजू नका असं सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आलेले पाहून पोलीस कर्मचारी मंत्रिमहोदय यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पुढे सरसावले. सुरू असलेल्या पावसाला पाहून पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत अजित पवार यांनी पोलिसांना भिजू नका असं सांगत गार्ड ऑफ ऑनर नाकारला. अजित पवार जितके आक्रमक आहेत तितकेच हळवे आहेत त्यांच्या माणुसकीचे आज सुद्धा दर्शन सर्वांना घडले. उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी दाखवलेली माणुसकीही चर्चेचा विषय ठरली आहे.