कोरोनाच्या काळजीपोटी अजित पवार यांनी पुष्पगुच्छ नाकारला…”म्हणाले अरे बाबा!”

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियमांच्या चौकटीत राहून काम करायला आवडते. त्यांचा स्वभाव हा काटेकोरपणे नियम पाळत काम करणार आहे. आपल्या रोखठोक स्वभावाने ते सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर बोलताना असेल किंवा एखादे वक्तव्य असेल. बोलताना सहज शाब्दिक टपली मारण्याची त्यांची शैली सर्वश्रुत आहे.

शुक्रवारी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरु होण्याआधी अजित पवारांना त्यांच्या एका हितचिंतकाकडून एक पुष्पगुच्छ पाठवण्यात आला. मात्र आपल्या खास शैलीत भाष्य करत अजित पवारांनी हा पुष्पगुच्छ नाकारला.

अजित पवार तिथे गर्दी असे समीकरण असतेच. असाच एका कार्यकर्त्याने गर्दीतून “दादा तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे,” असं म्हणत पुष्पगुच्छ पुढे केला. मात्र अजित पवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिला. “काय करतो आता. अरे, बाबा काहीतरी नियम पाळा. कोणाकडून हा गुच्छ आणला. त्याला करोना होता का नाही, काय माहिती नाही काय नाही, जर काळजी घ्या,” असे सांगितले. त्यांची स्पष्ट बोलण्याची शैली सर्वश्रुत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.