अजित पवारांच्या ‘त्या’ एका वाक्याने मेटेंच्या अपघाताला वेगळंच वळण !

0

मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात दुःखद निधन झाले आहे. ते पुण्याहून मुंबईला जात असताना पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. मुंबईत आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते.

विनायक मेटे यांच्या निधनानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मेटेंना आदरांजली वाहिली आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! असं अजित पवार म्हणाले आहेत.

तर, अजित पवार यांनी याबाबत बोलताना एक शंका उपस्थित केली आहे. ‘बीडहून मुंबईकडे निघालेल्या विनायक मेटेंचा रात्रभर प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे होते. माझ्या अंदाजानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात झाला असावा,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विनायक मेटे यांना 6.20 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पल्स नव्हते. बीपीही नव्हता ईसीजीमध्ये फ्लॅट लाईन दिसून आली होती. त्यांना आणलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता.ऑन द स्पॉट मृत्यू झाला, असं म्हणणं घाईचं ठरेल. पाच वाजून पाच मिनिटांनी अपघात झाला. पोलिसांना लिव्हर,छाती आणि डोक्यात मार लागला होता. ब्रेनस्टेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पोस्टमॉर्टेमनंतर सविस्तर कळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.