
“राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील…,” शरद पवारांनी सांगितलं ठाकरे सरकार टिकण्याचं कारण
महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल का ? नाही अशा शंकाकुशंका सातत्याने माध्यमांच्या मध्ये चर्चिल्या जातात. काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा महाराष्ट्रामध्ये दिल याच्यानंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले होते मात्र आता यावरती देशाचे नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल. राज्यातील सरकार मध्ये योग्य समन्वय असून सगळे व्यवस्थित चाललेले आहे.
शरद पवार म्हणले की “सरकार चालवताना कधीतरी काही प्रश्न निर्माण होतात. असे प्रश्न येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली आणि त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वतीने काही सहकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली. यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई व राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील त्यामध्ये आहेत,” असं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तसेच शरद पवार पुढे म्हणाले की “कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे आमचे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यासंबंधी निर्णय घेतात. त्यामुळे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. आणि याच पद्धतीने जाण्याची भूमिका सर्वांची असल्याने सरकार पाच वर्ष टीकेल याबाबत शंका नाही,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.