नमस्कार, मी अजित पवार बोलतोय; जामगावच्या दिव्यांग चित्रकाराला उपमुख्यमंत्री फोन करता तेंव्हा….

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वभाव उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. चुकीला चूक म्हणायचं आणि चांगला असेल तर कौतुक करायचं; हा त्यांचा स्वभाव. त्यांच्या बोलण्यामागे गावाकडची लकब असते. तसेच मिस्कील टीका टिप्पणी करण्यात अजितदादा पवार प्रसिद्ध आहेत.

अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील एका चित्रकाराचं फोन करुन कौतुक केलंय. बार्शी तालुक्यातील जामगाव येथे राहणाऱ्या तरुण महेश मस्केला दादांनी फोन आला. नमस्कार, मी अजित पवार बोलतोय. हे शब्द ऐकल्यावर महेशला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. महेश यांनी आजपर्यंत विविध नेत्यांचे चित्र पिंपळाच्या पानावरती काढले आहेत.आज अचानक त्यांना चित्र पाहिल्यानंतर अजित पवार यांचा फोन आला ही गोष्ट त्यांच्या साठी अविश्वसनीय होती.

त्यांनी अजितदादा पवारांचे असेच एक चित्र रेखाटून त्याने बारामतीला पाठविले होते. हे चित्र पाहून अजित पवारांनी महेशला फोन केला. व त्यांच्या कलेच मनापासून कौतुक केलं आहे.

या अगोदर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे चित्र महेश यांनी रेखाटले होते. त्यांना एका व्यक्तीकडून पवारांच्या घरचा नंबर मिळाला होता. त्यांनी सुनेत्रा पवार यांना पिंपळाच्या पानावर काढलेलं चित्र पाठवले होते. त्यांनी कौतुक पण केले होतें. असेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चित्र काढून त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठवले. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना चित्र दाखवले. त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अजित दादांनी महेशला फोन करुन त्यांच्या चित्रकेलंच कौतुक केलं. तसेच, कोरोना महामारीचं संकट कमी झाल्यानंतर आपण भेटू, असेही आश्वासन दिलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.