अजित दादा पवारांची राजकीय खेळी यशस्वी,पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेन दिला राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा

0

सध्या पंढरपूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेतची ठरत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 एप्रिलपासून सभांचा धडाका लावला आहे.दिवसभर सभा गाजवणार्या अजित दादांनी रात्री राजकीय समन्वय साधणार्या काही गाठी भेटी घेतल्या होत्या त्यात शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकार्यांशी चर्चा केली होती.

यावेळी मनसेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.अजित दादांनी अनेक महत्वाचे मोहरे स्वताकडे वळवण्याचे प्रयत्न केले असून त्यात त्यांना यश आलेल दिसून येत आहे.कल्याणराव काळेंनी अगोदरच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.आज मनसेनही राष्ट्वादीला पाठींबा जाहीर केला,इतकच नाही ते भगीरथ भालकेंचा फिरून प्रचारदेखील करणार आहेत.परिणामी राष्ट्रवादीच पारड जड झालेल आहे.

भाजपन पंढरपूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.त्यांनी त्यासाठी समाधान अवताडेंना उमेदवारी देऊ केली आहे.सांगली आणि जळगाव महानगरपालिकेत पराभवाची नामुष्की भाजपला चांगलीच घायाळ करून गेली असून त्यांनी पंढरपुरात आपली सगळी ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनेही जीवाचे रान केले आहे.कोरोनामुळे राज्यावर लॅकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे,परंतु अजित दादा त्यांच्यावरील उपमुख्यमंत्री पदाचा ताण सांभाळत पंढयपुरात प्रचार करत आहेत.तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही त्यांना साथ देत सभा घेत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.