कृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी!

0

महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या खरीप हंगामामध्ये पेरणी केली आहे राज्यांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे सुरुवात केली. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत खरीप हंगामासाठी समाजातील दुर्बल घटकांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना बियाणे वाटप केल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या वावरत जाऊन पेरणी केली आहे. ही पेरणी चिंचावड (ता. मालेगाव) येथे केली. कृषिमंत्री यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या खरीप हंगामात श्री. भुसे यांनी सौंदाणे शिवारातील शेतात नांगरणी केली होती.

दौऱ्यादरम्यान त्यांना चिंचावड शिवारात पेरणी सुरू असताना आढळल्याने त्यांनी वाहनांचा ताफा थांबवून थेट शेतात जात पेरणी केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.