भारताच्या पराभवानंतर ह्या अभिनेत्याने टार्गेट केलं चक्क मोदींना;वाचून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क..!

0

नेहमीच स्वतःच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि खळबळजनक भविष्यवाणीमुळे चर्चेत असलेला एक अभिनेता तसेच स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अशा काही ट्विट केल्या आहेत ज्यांना वाचून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! या ट्विट्समध्ये केआरकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबरच सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेला लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमारवरही निशाणा साधलाय.

खरंतर भारत पाक सामन्याआधी केआरकेने भारत सामना जिंकेल असं मत व्यक्त केलेलं. “भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा काही सामना नाही…ही तर फक्त एक थट्टा आहे. पूर्ण जगाला माहितेय की भारतच सामना जिंकणार,” असं त्याने ट्विट केलं होतं; पण कालच्या सामन्यामध्ये वेगळीच गोष्ट घडली. फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका खरंतर भारताला बसला.

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. पाकिस्तानी संघाची ही कामगिरी पाहून केआरके मात्र थक्क झालाय.त्याने पाकिस्तान च्या विजयानंतर एक ट्विट केलं जे सध्या जाम चर्चेत आलं आहे.

“आज मी पाकिस्तानी संघाला जवळजवळ पाच ते सहा वर्षांनी मैदानात खेळताना पाहतोय. त्यामुळे मला ते एवढं चांगलं खेळतात हे ठाऊक नव्हतं. म्हणूनच मी जुहूमधील गल्ली टीमशी केलेल्या त्यांच्या तुलनेसाठी माफी मागतो,” असं तो एका ट्विटमध्ये म्हणालाय.“मला ठाऊक नव्हतं की बाबर आझम हा आयसीसी टी २० रॅकिंगमध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच २१ वर्षीय शाहीन आफ्रिदी एवढा खतरनाक गोलंदाज असल्याचंही ठाऊक नव्हतं. बाबर हा विराटपेक्षा मोठा खेळाडू आहे हे अविश्वसनीय आहे,”अश्या शब्दांत केआरकेने त्याची प्रतिक्रिया मांडली.

पण भारताचा पराभव झाला याचं खापर मात्र त्याने चक्क अक्षय कुमार वर फोडला.खरंतर सामना पाहण्यासाठी अक्षय कुमावर केआरकेने एक वेगळीच भन्नाट टीका केलीय. “अक्षय कुमार तू भारत पाक सामना पाहण्यासाठी मैदानावर का गेलास? तुझी नकारात्मकता त्यात विराट कोहलीची नकारात्मकता म्हणजे पाकिस्तानचा १० विकेट्सने विजय,” असा वादग्रस्त टोलाही कमाल आर खानने लगावलाय.”मला विश्वास बसत नाहीय की पनौती हा शब्द अक्षय कुमार सरांमुळे चर्चेत आहे. सर तुम्ही तर चर्चेत आलात,” अशा शब्दांत त्याने अक्षय कुमार वर टीका केली.

पण एवढं करूनही त्याचं मन भरला नव्हता त्यानंतर त्याने भारतीय क्रिकेट टीम चा कॅप्टन विराट कोहलीवर निशाणा साधताना कमाल आर खानने विराटने भारताचं नाक कापल्याची टीका केलीय. “तू आजच कर्णधारपदाचा राजीनामा दे”, असंही कमाल आर खानने म्हटलंय.

आता तरी कमाल खान शांत झाला असणार अस नेटकऱ्यांना वाटलं पण लगेच त्याची अजून तिसरी एक ट्विट समोर आली,खरतर पराभवानंतर केआरकेने पंतप्रधान मोदींचा हाताची घडी घालून असलेला एक फोटो ट्विट करत मोदींवरही निशाणा साधलाय. “मोदी सर जे याआधी कधीच झालं नाही ते सुद्धा तुमची सत्ता असताना घडलंय. मोदी है तो मुमकिन है, ह्या शब्दांत त्याने मोदीवर सुद्धा एक प्रकारे टीका केली.

खरंतर सोशल माध्यमातून मागील काही काळापासून सरकारच्या अनेक जाहिरातींवर मोदींचा फोटो हा तुलनेने मोठा असल्याच्या बातम्या अलीकडे खूप आल्या आहेत. विशेष म्हणजे लसीकरणापासून ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या सत्कारापर्यंत सर्व ठिकाणी मोदींचा हाताची घडी घातलेला मोठ्या आकारातील फोटो छापल्याचं दिसत. हा फोटो मिम्समध्येही अनेकदा वापरण्यात आलाय. ह्याच भावनेतून केआरकेनेही मोदींना या पराभावचं क्रेडिट देत टीका केल्याचं चित्र इथं दिसत आहे.खरंतर कमाल खान च्या ह्या ट्विट ने ट्विटर मात्र एक प्रकारची खळबळ माजवली हे मात्र विशेष!त्याच्या त्या टिकाग्रस्त टिप्पन्नीने खूप लोकांना राग आला आणि काही लोकांना मजा सुद्धा आली. पण आता त्याच्या ह्या प्रतिक्रिया वर अक्षय कुमार आणि भारतीय जनता पार्टी काय प्रतिक्रिया देणार याकडे मात्र सगळ्यांच लक्ष वेधून आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.