पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला! बायोपिक बाबत चर्चा ?

0

निवडणूक रणनिती कार प्रशांत किशोर याने मुंबईमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमध्ये प्रशांत किशोर यांच्यावर बायोपिक बनवण्याबाबत चर्चा होऊ शकते किंवा झाली असावी अशी चर्चा सुरू आहे ापूर्वी प्रशांत किशोर वर चित्रपट बनवण्या बाबतीत खूप सार्‍या चर्चा झाल्या आहेत.

भारतामध्ये राजकीय विश्लेषक तथा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचे चांगलीच कारकीर्द चर्चेत आहे त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून खूप मोठी उलथापालथ केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस प्रशांत किशोरच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज बनवू शकतं. तथापि, अद्याप ही बाब प्रशांत किशोर यांनी मंजूर केलेली नाही हे मात्र खरं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.