अक्षय -गोविंदानंतर आता भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांना देखील करोनाची लागण…

0

राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वच जण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत.बॉलिवूडवर करोनाचे ढग पसरताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये करोनाची लागण होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी वाढताना दिसत आहे. नुकतेच अभिनेता अक्षय आणि गोविंदा यांना करोना झाला अशी बातमी समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत असतानाच भूमी पेडणेकर आणि विकी कौशल या दोघांना देखील करोनाची लागण झाली हे समजले.

भूमी पेडणेकरने समाज माध्यमांवर तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. भूमीने एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. मी विलगीकरणात असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या. ” असं म्हणत भूमीने ती संपूर्ण काळजी घेत असल्याचं सांगितलं आहे.सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. सर्व काळजी घेऊनही मला करोनाची लागण झाली. मास्क घाला. सॅनिटाइझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा आणि सामाजिक भान राखा.” अशी पोस्ट करत भूमीने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे विकी कौशलने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपल्याला करोनाची लागण झाली याची माहिती दिली आहे. “संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,” अशा आशयाची पोस्ट त्याने केली.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नी या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.