
कौतुकास्पद! अत्यंत साध्यापद्धतीने लग्न करून गावातील कोविड सेंटरला आर्थिक व अन्नधान्यच्या स्वरूपात मदत!
कोरोनामुळे जगातील जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे अनावश्यक खर्च टाळून अगदी साधा विवाह सोहळा संपन्न झाला. नवरदेव आणि नवरी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला आर्थिक व अन्नधान्यच्या स्वरूपात सुद्धा मदत करत हा विवाहसोहळा संपन्न झाला.
ऋतुराज पाटील ट्विट करत म्हणतात की “कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगाव गावातील रजत रमेश काळे व अपूर्वा चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्यापद्धतीने लग्न करून या बचतीमधून गावातील कोविड सेंटरला आर्थिक व अन्नधान्यच्या स्वरूपात सुद्धा मदत केली. उंचगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मालुताई काळे व माजी सरपंच गणेश काळे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. अडचणीच्या वेळी सामाजिक जबाबदारी ओळखून काळे आणि चव्हाण कुटुंबीयांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल त्यांचे मनापासून आभार”!
अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी नवविवाहितांचे कौतुक केले आहे तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांचेही त्यांनी कौतुक केले आहे. या विवाह सोहळ्यास आमदार ऋतुराज पाटील पाटील उपस्थित होते.